Ad will apear here
Next
फॉर्च्युन ‘चेंज दी वर्ल्ड’ यादीत रिलायन्स जिओ प्रथम
यादीत दोनच भारतीय कंपन्या; महिंद्रा अँड महिंद्रा २३ व्या स्थानावर
मुंबई : फॉर्च्युनच्या नव्या ‘चेंज दी वर्ल्ड’ या जागतिक यादीमध्ये रिलायन्स जिओने पहिले, तर महिंद्रा आणि महिंद्रा कंपनीने २३वे स्थान मिळवले आहे. ‘अलिबाबा’सारख्या दिग्गज कंपन्यांना मागे टाकून ‘जिओ’ने अव्वल स्थान पटकावले आहे. या यादीत केवळ दोनच भारतीय कंपन्यांचा समावेश आहे.  

भारतीयांना स्वस्त दरात इंटरनेट आणि कॉलिंग सेवा उपलब्ध करून डिजिटल व्यवहारांना चालना दिल्याबद्द्ल ‘जिओ’चा यात समावेश करण्यात आला आहे. गेल्या सात वर्षांमध्ये कार्बन उत्सर्जनामध्ये तब्बल ४४ टक्के घट करण्यात यश मिळवल्याबद्दल महिंद्रा आणि महिंद्रा कंपनीचा या यादीत समावेश करण्यात आला आहे. या यादीत पहिल्या दहा स्थानांमध्ये ‘जिओ’नंतर दुसऱ्या स्थानावर मेर्क, त्यानंतर अनुक्रमे बँक ऑफ अमेरिका, इंडीटेक्स, अलिबाबा समूह, क्रोगेर, झायलेम, एबीबी, विट वॉचर्स इंटरनॅशनल आणि हचेस नेटवर्क सिस्टीम्स या कंपन्यांचा समावेश आहे. 

महिंद्रा आणि महिंद्रा समूह विविध उपक्रम राबवून कार्बन उत्सर्जनामध्ये घट करण्याचा प्रयत्न करत आहे. २०३०पर्यंत ऊर्जा उत्पादकता दुप्पट करण्याची बांधिलकी असणाऱ्या, ‘ईपी१००’ करारावर स्वाक्षरी करणारी ही पहिली जागतिक कंपनी आहे. गेल्या आठ वर्षांत, वाहन निर्मितीत ऊर्जेचा वापर ६३ टक्क्यांनी, तर  ट्रॅक्टर  निर्मितीत ऊर्जेचा वापर ३३ टक्क्यांनी कमी करण्यासाठी कंपनीने उत्पादन प्रक्रियेमध्ये बदल केले असून, पाच उत्पादन प्रकल्पांमध्ये ‘झीरो वेस्ट टू लँडफिल’ यशस्वीरीत्या राबवले आहे. या सगळ्या प्रयत्नांची दखल घेऊन या यादीत कंपनीला पहिल्या २५ कंपन्यांमध्ये स्थान देण्यात आले आहे. 

या जागतिक यादीत दैनंदिन कार्यामध्ये सार्वजनिक आरोग्य, पर्यावरण, आर्थिक किंवा अन्य सामाजिक आव्हाने हाताळणाऱ्या विविध कंपन्या निवडण्यात आल्या. त्यामध्ये, किमान एक अब्ज डॉलर वार्षिक विक्री केलेल्या ५७ कंपन्यांचा व सहा रायजिंग स्टार्सचा समावेश होता.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/CZMRBR
Similar Posts
‘जिओ’ला दोन वर्षे पूर्ण मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीजच्या ‘जिओ नेटवर्क’ने अत्यंत स्वस्त दरात मोबाईल डेटा उपलब्ध करून दिल्यामुळे देशातील मासिक डेटावापर २० कोटी जीबीवरून तब्बल ३७० कोटी जीबीवर पोहोचला आहे. एकट्या जिओचे ग्राहक त्यामधील २४० कोटी जीबी डेटाचा वापर करत आहेत. मोबाइल डेटा वापराबाबत भारत १५५ व्या स्थानावावरून पहिल्या क्रमांकावर आला आहे
विवाहाचा खर्च वाचवून दुष्काळ निवारणासाठी अडीच लाखांची मदत मुंबई : सध्या असलेली दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन धुळे जिल्ह्यातील कल्पेश आण‍ि प्रियांका देवरे या दाम्पत्याने विवाहावरील खर्च वाचवून दुष्काळ निवारणासाठी मुख्यमंत्री सहायता निधीला अडीच लाख रुपयांची मदत केली आहे. दोन लाख ५१ हजार रुपयांचा धनादेश त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नुकताच सुपूर्द केला
डाळिंब उत्पादनातून शाश्वत शेतीची ‘नांदी’ मुंबई : वेगाने विकसित होणाऱ्या मात्र अद्यापही कृषिप्रधान असलेल्या भारतासारख्या देशात शेतीला विविध प्रकारच्या अस्मानी आणि सुलतानी संकटांना तोंड द्यावे लागते. या पार्श्वभूमीवर शेतीची शाश्वतता वाढविणे म्हणजेच अनिश्चितता कमी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. हीच गोष्ट लक्षात घेऊन महिंद्रा अॅग्री सोल्यूशन्स लिमिटेड
रिलायन्स आता व्हिडिओ स्ट्रीमिंगच्या क्षेत्रात येण्याच्या तयारीत मुंबई : मोफत डेटा, कॉल्स देत रिलायन्स जिओने मोबाईल सेवा क्षेत्रात धुमाकूळ घातला. आता व्हिडिओ स्ट्रीमिंग क्षेत्रात धमाका घडविण्यासाठी रिलायन्स इंडस्ट्रीज सज्ज असल्याची चर्चा आहे. गुगल, नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राईम, स्पॉटीफाय आदी व्हिडिओ कंटेंट पुरविणाऱ्या कंपन्यांच्या स्पर्धेत रिलायन्स उतरणार आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language